त्वचा रोगात कापराचे मलम :
इसब, आगपेण इ. त्वचारोगात आग होत असेल तर कापराचे तेल लावावे. तसेच कापूर एक तोळा व पांढरा कात एक तोळा यांची पूड करून काशाच्या ताटात घालावी व त्यात गाईचे अथवा म्हशीचे तूप दहा तोळे घालून घोटावे व मलम तयार करावे हे मलम इसबावर लावल्यास इसब बरा होतो. व जखमा, व्रण इत्यादीस लावल्यासही बरे वाटते. तसेच गळ्यास कर्पूरार्क लावून, त्यावर त्याचे तेल चोळल्याने ठणका कमी होतो व गळू जिरते. याशिवाय उसण भरणे, सांधे दुखणे, लचकणे, अनेक तऱ्हेच्या वेदना, जुनाट संधिवात, कंबर दुखणे, पाय वळणे. शरीराच्या कोणत्याही भागास मुंग्या येणे इत्यादीवर कापराचे तेल चोळावे म्हणजे वेदना शमतात. त्याचप्रमाणे ढेकूण, पिसवा, डास वगैरेचा दंश कमी होण्यास झोपतांना कापराचे तेल अंगास चोळून झोपावे. नारूवर कापूर अर्धा गुंज तुपातून खावा. तसेच नारू बाहेर येऊ लागताच एक तोळा कापूर व तीन तोळे लेणी हे केळीच्या पाण्यातून तांब्याचे भांड्यात खलून लावावे. म्हणजे लवकर बाहेर येतो. विंचवाचे विषावरही विड्यातून एक गुंज कापूर खाल्यास अथवा त्याचा अर्क घेतल्यास उतार पडतो.
याशिवाय दाढ फार दुखत असल्यास कापूर दाढेत धरावा. किंवा त्याच्या तेलाचा बोळा दाढेत बसवावा. कापूर एक तोळा, पांढरा कात एक तोळा व दालचिनी एक तोळा यांची पूड करून त्यात हिरड्याची पूड सात तोळे घालावी व त्याने दात घासावे म्हणजे अनेक प्रकारचे दंतरोग बरे होतात.
जास्त घेतल्यास अनिष्ठ परिणाम :कापूर हा एक उत्तेजक व वातनाशक असल्याने तो हृदयरोगांवरही उपयुक्त आहे. छातीत कळ येणे अथवा धडधडणे यावर अर्धा ते एक गुंज कापूर पाण्याबरोबर घ्यावा. अथवा कर्पूरार्क द्यावा. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंनाही उत्तेजन मिळते. दम्यावरही कापूर व हिंग समप्रमाणात घेऊन त्याच्या मुगाएवढ्या गोळ्या करून दिवसातून तीन वेळा एकेक गोळी घेतल्यास गुणकारी आहे. याप्रमाणे कापूर उत्तेजक व विषघ्न असा आहे. पण तो जास्त प्रमाणात घेतल्यास अनिष्ट परिणाम करतो. म्हणून त्याचा उपयोग जरूरीपुरताच व बेताने करावा.
कापरात ठेवल्याने बी टिकते :याप्रमाणे कापराचे उपयोग असून कर्पूरादि चूर्ण, कर्पूरदिवटी, लवंगदि चूर्ण इत्यादी सिद्ध औषधीतही ती वापरलेला आहे. त्यापैकी कर्पूरादि चूर्ण हे सर्दी, खोकला, पोटात वात धरणे वगैरेवर तसेच वृद्ध माणसाचा खोकल व श्वास यावर अर्धा ते एक मासा चूर्ण, कोमट पाणी, मध दूध-साखर यातून दोन वेळा द्यावे तसेच कापराची वडीही खडीसाखरेबरोबर एक गोळी तोंडात धरून चघळल्याने आवाज बसणे, खोकला, ढास लागणे ही लक्षणे कमी होतात. लवंग, कापूर, कंकोळ वगैरे औषधे घालून तयार केलेले लवंगाचे चूर्ण अर्धा ते एक मासा मध-साखर, मध-पाणी यातून घेतल्यास अग्निमांद्य, अरुचि, अपचन, जीर्णज्वर, पडसे हे विकार थांबतात याप्रमाणे कापराचे गुणधर्म असून शिवाय तो वस्त्रात व पुस्तकात ठेवला असता कसर लागत नाही. तसेच त्याच्या पाण्यात झाडाचे बी भिजवून ठेवले व कितीही दिवसांनी बाहेर काढून पेरले तर लागलीच उगवते.
No comments:
Post a Comment