बेलाच्या बेलफळांचा बेलमुरब्बा करतात. बेलमुरब्ब्याचा उपयोग अतिसार, जुलाब यावर खूप चांगला होतो.
आव पडणे, शेम चिकट पडणे, संडास वाटे रक्त पडणे, यावर बेलफलातील गर किंवा बेलमुराब्बा द्यावा.
लहान मुलांना सारखी आव होत असेल तर त्यावरही बेलमुरब्बा देतात. मुलांना जंत झाले असल्यास बेलाच्या पानांचा रस द्यावा. अम्लपित्तावरही बेलाच्या पानांचा रस देतात.
शरीराला घामामुळे दुर्गंधी येत असेल तर बेलाच्या पानांचा रस लावावा. घामाची दुर्गंधी येण्याचे बंद होते. उलट्या होत असल्यास बेलफळाच्या सालीचा काढा प्यावा.
दमा, खोकला यावर बेलाच्या पानांचा काढा द्यावा. तोंड आले असल्यास बेलाच्या सालीचा काढा करून त्याने गुळण्या कराव्यात. तोंड येणे, तोंडात जखम होणे, फोड येणे, यावर या काढ्याचा खूप उपयोग होतो. मूळव्याध, मलावष्टंभ यावर बेलाच्या पानांचा रस द्यावा.
बेलापासून 'बिल्वावलेह' तयार करतात. शौचाला शेम चिकट पडणे, आव पडणे, रक्तमिश्रीत आव पडणे, खूप कुन्थूनही थोडीशीच शौचाला होणे यावर बिल्वावलेहाचा खूप चांगला उपयोग होतो.
No comments:
Post a Comment